13 पेक्षा अधिक महिलांना अश्लील कॉल; वाई तालुक्यातील व्यक्तीविरोधात कारवाई
सातारा : वाई तालुक्यातील एका गावात चक्क एका व्यक्तीने गावातील तब्बल १३ हुन अधिक महिलांना मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण गावात खळबळ असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हि घटना दि. २५ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजता घडली होती. संबंधित व्यक्तीने महिलांना अनुचित व्हिडिओ कॉल करत मनास लज्जा उत्पन्न होईल असे गैरकृत्य केल्याचे समोर आले आहे.
या घटनेबाबत पीडित महिलांनी अखेर धैर्य दाखवत पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार दि. ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता वाई पोलिस ठाण्यात त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वाई पोलिस ठाण्याचे हवालदार इथापे हे करत आहेत.








