वेंगुर्ले । प्रतिनिधी
वेंगुर्ले दाभोली मार्गे कुडाळ रस्त्यावर दाभोली हळदणकरवाडी येथे बोलेरो पिकअप व आय प्रेस ई बाईक मध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाला . हा अपघात शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास झाला . सदर युवक वेंगुर्ले तालुक्यातील सुंदरभाटले येथील रहिवासी असल्याची ओळख घटनास्थळी पटविण्यात आली होती. अपघाताचे वृत्त समजताच हळदणकरवाडी येथील नागरिक तात्काळ घटनास्थळी जमा झाले. पोलीस पाटील जनार्दन पेडणेकर, सरपंच उदय गोवेकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण बांदवलकर, पंचायत समितीचे माजी सदस्य समाधान बांदवलकर, दादा गोवेकर, वायंगणी उपसरपंच रवींद्र धोंड, दिलीप बांदवलकर, मनोज कोळेकर, सामाजिक कार्यकर्ते अण्णा जोशी, उमेश जोशी, प्रकाश बांदवलकर, गणेश हळदणकर, सिद्धेश प्रभू, माजी सरपंच मनाली हळदणकर, दाभोली ग्रामपंचायत सदस्य जया पवार आदी घटनास्थळी दाखल झाले.









