मुतगा विशाल मंगल कार्यालयानजीकची घटना
बेळगाव : मोटारसायकलवरून पडून गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मी गल्ली, सांबरा येथील एका युवकाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी मध्यरात्री मुतगा येथील विशाल मंगल कार्यालयाजवळ ही घटना घडली आहे. मारिहाळ पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. शुभम चंद्रकांत सुतार (वय 31, रा. लक्ष्मी गल्ली, सांबरा) असे त्याचे नाव आहे. मोटारसायकलवरून सांबऱ्याकडे जाताना बेळगाव-बागलकोट रोडवरील मुतगा येथील मंगल कार्यालयानजीक मोटारसायकलवरून पडून तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता गुरुवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. मारिहाळचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक पुढील तपास करीत आहेत.









