बांदा पोलिसांची इन्सुली तपासणी नाका येथे कारवाई
प्रतिनिधी
बांदा
गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतूकप्रकरणी बांदा पोलिसांनी इन्सुली तपासणी नका येथे कणकवली येथील आलिशान कारवर कारवाई केली. ही कारवाई दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली . याप्रकरणी कणकवली येथील युवकास ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही पोलीस करीत आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी अवैध धंदे सिंधुदुर्ग मध्ये चालू देणार नाही असा प्रशासनाला इशारा देताच बांदा पोलीससुद्धा ऍक्शन मोडवर आले आहेत.









