पाच वर्षांचा उच्चांक राहिल्याची नोंद : 18 ते 25 वर्ष वयोगटातील तऊणांचा सहभाग 56 टक्क्यांवर
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
वर्ष 2022 मध्ये निर्माण झालेल्या एकूण नोकऱ्यांमध्ये 18 ते 25 वर्षे वयोगटातील लोकांचा वाटा 56 टक्के आहे. गेल्या 5 वर्षांत या वयोगटातील सहभागाची ही सर्वोच्च पातळी आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (इपीएफओ) च्या मासिक वेतन डाटाचे विश्लेषण दर्शविते की 2018 मध्ये इपीएफओ सदस्यांपैकी 50.9 टक्के संख्या ही तरुणांची असल्याची माहिती आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय एप्रिल 2018 पासून दर महिन्याला इपीएफओ पेरोल डाटा सादर करते आहे.
2018 आणि 2022 दरम्यान, 26 ते 35 आणि 35 वरील वयोगटातील व्यक्तिंचा रोजगारातील वाटा अनुक्रमे 3 टक्क्यांहून कमी होऊन 26.6 टक्के आणि 16.9 टक्के झाला आहे. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये 18 ते 25 वर्षे वयोगटातील लोकांच्या रोजगारातील प्रमाणात 13.4 टक्के वाढ झाली आहे. या तुलनेत नवीन रोजगारामध्ये 12.5 टक्के वाढ झाल्याचे या आकडेवारीत स्पष्ट केले आहे.
नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध झालेल्या तिमाही नियतकालिक पीएलएफएसच्या अहवालानुसार, तरुण बेरोजगारीचा दर 18.5 टक्के आहे, जो एकूण बेरोजगारीच्या 7.2 टक्के दरापेक्षा दुप्पट आहे.
टीमलीज सर्व्हिसेसच्या सह-संस्थापक रितुपर्णा चक्रवर्ती म्हणतात की, 18 ते 25 वर्षे वयोगटातील लोकांच्या वाट्यामध्ये वाढ अशा वेळी झाली आहे जेव्हा रोजगार निर्मिती कोविड-19 पूर्वीसारखी नव्हती.
नवीन नोकऱ्यांमध्येही तरुणींचा वाटा वाढला आहे आणि 2018 मधील 19 टक्क्यांच्या तुलनेत 2022 मध्ये हा हिस्सा 24.5 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
तथापि, रोजगार निर्मिती अजूनही 18.6 टक्के महामारीपूर्व पातळीपेक्षा कमी आहे. 2018 मध्ये 1.45 कोटी सदस्यांच्या तुलनेत केवळ 1.18 कोटी नवीन सदस्य इपीएफओ योजनेत आले आहेत.
तरुणाईसाठी रोजगाराचा विषय चिंतेचा?
तरुण्रील या प्रकारच्या रोजगाराचे प्रमाण 23.3 टक्क्यांपर्यंत वाढले आहे, जे 2018 मध्ये 20.6 टक्के होते. हे प्रमाण 2012 मध्ये 29.3 टक्के आणि 2010 मध्ये 32.4 टक्क्यांपेक्षा कमी राहिल्याचे सांगितले आहे.









