कराड :
येथील रविवार पेठेतील काझीवाड्यात घराच्या टेरेसवर स्वयंपाक करण्यासाठी बल्ब लावण्यासाठी वायर जोडत असताना युवकास शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. रईस अहमद रियाज काझी (वय 38) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी शब्बीर अब्दुलसुतार काझी यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रईस हा कुटुंबासह काझीवाड्यात राहात होता. रविवारी सायंकाळी टेरेसवर स्वयंपाक बनवण्यासाठी बल्ब लावायचा होता. बल्बसाठी वायर जोडत असताना त्याला अचानक शॉक बसला. जोराचा शॉक बसल्याने रईस दूरवर फेकला गेला. यात तो जखमी होऊन बेशुद्ध पडला. कुटुंबीयांनी रईस याला तात्काळ स्पंदन रूग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अचानक घडलेल्या घटनेने काझी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.








