वार्ताहर / कळंबा
येथील कळंबा तलावाच्या काठावर मनोऱ्या लगत एका तरुणाचे आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना असलेले पाकीट आणि चप्पल आढळून आले. त्यावरुन त्या तरुणाने तलावात उडी टाकून आत्महत्या केली असावी. या शक्यतेने जीवरक्षक आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानाच्या मदतीने मंगळवार सकाळपासून तलावात शोध मोहिम हाती घेतली आहे. सायंकाळी सहा नंतर अंधार पडल्याने शोध कार्यात अडथळा आल्याने शोध मोहिम थांबविण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवारी सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना कळंबा तलावाच्या काठावर एका तरुणाचे आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना असलेले पाकीट आणि चप्पल आढळून आले. नागरिकांनी तात्काळ गावचे पोलीस पाटील अनिता तिवले यांना याबाबत माहिती दिली पोलीस पाटील यांनी करवीर पोलिसात याबाबत वर्दी दिली करवीर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन माहिती घेतली असता उपनगरातील बुद्धीहाळकर नगर कळंबा येथील तरुणाचे असल्याचे पोलीस तपासात समोर आले. तसेच तो संबंधीत तरुण ही बेपता झाला असल्याचे समोर आले. मंगळवारी पाच ते सहा तासाच्या अथक प्रयत्न नंतर ही हा युवक सापडून आला नसल्याने शोध मोहीम थांबवण्यात अली आहे. उद्या पुन्हा अग्निशमन दलाचे जवान व जीवरक्षक तसेच अन्य यंत्र समुग्रीच्या सहाय्याने कळंबा तलावात त्या युवकाचा शोध घेतला जाणार आहे. उपनगरातील एका कुटुंबातील तरुण बेपत्ता झाला आहे. या घटनेमुळे त्या कुटुंबामध्ये भीतीचे वातावरन पसरले आहे. त्यामुळे त्या तरुणाने तलावात उडी घेवून आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.