सातार्डा –
सातारा येथे शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघातामध्ये नईबाग येथील भगवान उत्तम कासकर ( 43 ) हा तरुण जागीच ठार झाला.या दुर्घटनेमुळे नईबाग गावात शोककळा पसरली आहे. उत्तम यांचा शनिवारी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त शिर्डीला देवदर्शनाला जाताना काळाने घाला घातला. कंटेनर अंगावर पडल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात पेडणे येथील दोघेजण व साटेली येथील तरुण कमलेश कांबळी हे जखमी झाले आहेत.









