चुये/प्रतिनिधी
कावणे ता. करवीर येथील शिवदत्त मारुती पाटील या उमद्या युवकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. गोकुळचे अधिकारी एम. पी. पाटील यांचा तो एकुलता एक मुलगा होता.
शिवदत्त हा शेताकडील घरात जनावरांची वैरण कडबाकुट्टी मशीन वरती वैरण कुटी करीत होता. त्या वेळी विजेचा प्रवाह त्या कडबाकुटी मशिनमध्ये गेला. त्यामुळे त्या विजेचा जोराचा धक्का शिवदत्तला बसल्यामुळे तो जागीच कोसळला . घराशेजारी शेती काम करणारी त्याची आई गोठ्यात आल्यानंतर तिला शिवदत निपचिप पडलेला दिसला. त्यानंतर तात्काळ त्याला सरकारी रुग्नालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई- वडील दोन बहिणी असा परिवार आहे. शिवदत्त च्या अचानक मृत्यूने गावात शोककळा पसरली









