घरी परतताना घडला अपघात
बेळगाव : मोटारसायकल दुभाजकावर धडकून सोमवारी पहाटे धर्मवीर संभाजी चौकजवळ झालेल्या अपघातात कंग्राळी खुर्दचा तरुण ठार झाला. वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. उल्हास रवी पाटील (वय 24) राहणार कंग्राळी खुर्द असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. सोमवारी पहाटे 4.45 वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून घरी परतताना धर्मवीर संभाजी चौकजवळ मोटारसायकल दुभाजकावर आदळून तो खाली पडला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला सिव्हिल हॉस्पिटलला हलविताना त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. वाहतूक दक्षिण विभाग पोलीस पुढील तपास करीत आहेत.









