ओटवणे प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे नदीपात्रात म्हारसाकळ येथे पोहायला गेलेल्या माजगाव येथील तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे.ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.याबाबतची खबर सावंतवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. गेल्या मार्च महिन्यात 11 मार्च रोजी माजगावच्याच निखिल सूर्यवंशी या युवकाचा याच नदीत अवघ्या 100 मीटर अंतरावर बुडून मृत्यू झाला होता.









