वृत्तसंस्था / बडोदा
विश्व टेबल टेनिस फेडरेशनच्या युथ कंटेडर बडोदा टेबल टेनिस स्पर्धेला येथे बुधवारपासून प्रारंभ होत असून या स्पर्धेत 8 देशांचे सुमारे 165 टेबल टेनिसपटू सहभागी होत आहेत.
या स्पर्धेमध्ये यजमान भारतातर्फे सातवा मानांकित अंकुर भट्टाचार्यजी, सायली वाणी तसेच दिव्यानिशी भोमीक यांच्या कामगिरीकडे लक्ष राहिल. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 13 आणि 17 वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटातील सामने खेळविले जातील. या दोन्ही गटामध्ये भारताचे दिव्यानिशी भोमीक आणि अभिनंदन प्रतिवादी खेळत आहे. भारतातर्फे सिंड्रेला दास, तनिषा कोटेचा, सार्थक आर्या यांचाही या स्पर्धेत सहभाग राहिल. कोरियाचे चोई जिवूक, इंग्लंडचा रोहन दाणी, लंकेची तेवी समरवीरा यांच्याकडून भारतीय खेळाडूंना कडवा प्रतिकार अपेक्षित आहे.









