मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात जाण्याचा केला प्रयत्न
प्रतिनिधी / पणजी
वाढत्या महागाई विरोधात युवा काँग्रेसने काल मंगळवारी राजधानीत मोर्चा काढून नंतर मुख्यमंत्र्यांच्या आल्तीनो येथील शासकीय बंगल्यावर जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
सुरुवातीला येथील आझाद मैदानावर काँग्रेस कार्यकर्ते जमा झाले होते. यावेळी रिचा भार्गव (युवा सचिव), बिना नाईक (प्रदेश महिला अध्यक्ष), विजय भिके, संजय बर्डे, जॉन नाझारेथ, नौशाद चौधरी, हायराज मुल्ला, विवेक डिसिल्वा यांच्यासह 70 युवा कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर नेण्याचा निर्णय झाला.
मुख्यमंत्र्याच्या बंगल्याबाहेर फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता. काँग्रेस कार्यकत्यांनी बंगल्यावर जाण्याची मागणी केली. जायला न दिल्यामुळे त्यांनी घोषणाबाजी सुऊ केली. “आमकां जाय आमकां जाय, काने बटाट टमाट आमकां सवाय जाय”, “एक दो एक दो, भाजप को फेक दो”, “जब जब मोदी डरता है, पोलीस को आगे करता है”, अशा प्रकारच्या घोषणा त्यांनी दिल्या. पोलिसांनी त्यांना अडविले आणि नंतर ताब्यात घेतले.









