सावंतवाडी / प्रतिनिधी-
शहरातील माठेवाडा परिसरात राहणाऱ्या एका युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे. मात्र या युवकाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
आत्महत्या करणार्या “त्या” युवकाने “मी” विषारी द्रव्य वापरले आहे. त्यामुळे मास्क घातल्याशिवाय प्रवेश करु नका, असे दरवाजावर लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात आता ट्विस्ट आला आहे.









