सांगली :
कॉलर पकडून शिव्या दिल्याचा जाब विचारल्याने चिडलेल्या पाचजणांनी युवकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. हा हल्ला बुधवारी १४ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास मिरज तालुक्यातील तुंग रस्त्यावर असणाऱ्या खंडोबा मंदिराच्या समोर घडली. यामध्ये साईनाथ अजित चौगुले (वय १९, रा. खंडोबा देवळानजीक, तुंग) हा गंभीर जखमी झाला आहे.
याप्रकरणी सविता अजित चौगुले यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी यांचा मुलगा साईनाथ याच्यासमवेत संशयित अरुण बिरनाळे (रा. तुंग) याचा काही कारणावरुन वाद झाला होता. अरुण याने साईनाथ याची प्रतिनिधी सांगली कॉलर पकडून शिव्या दिल्याचा जाब विचारल्याने चिडलेल्या पाचजणांनी युवकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. हा हल्ला बुधवारी १४ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास मिरज तालुक्यातील तुंग रस्त्यावर असणाऱ्या खंडोबा मंदिराच्या समोर घडली. यामध्ये साईनाथ अजित चौगुले (वय १९, रा. खंडोबा देवळानजीक, तुंग) हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी सविता अजित चौगुले यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी यांचा मुलगा साईनाथ याच्यासमवेत संशयित अरुण बिरनाळे (रा. तुंग) याचा काही कारणावरुन वाद झाला कॉलर पकडून त्याला शिवीगाळ केली होती. ही बाब साईनाथ याने घरी सांगितल्यावर बुधवारी रात्रीच्या सुमारास तो आईसह अरुणला जाब विचारण्यासाठी गेला. खंडोबा मंदिर परिसरात अरुण हा त्याचे मित्र शेड्या लिंगाडे, बंडू कराडे, संदीप कराडे आणि वेदांत कराडे (सर्व रा. तुंग) यांच्यासमवेत थांबला होता. साईनाथ याने शिवीगाळीचा जाब विचारल्यावर अरुण बिरनाळे याने त्याला मारहाण केली. तसेच अन्य संशयितांनीही त्याला मारहाण केली. यावेळी अरुण याने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने साईनाथ याच्या डाव्या पायाच्या पोटरीवर वार केला. भांडण सोडविण्यास मध्ये पडलेल्या फिर्यादी सविता यांना देखील संशयितांनी शिवीगाळ करण्यात आल्याची तक्रार नोंदविली आहे.








