राजारामपुरीत ट्रक चालकाचा हल्ला; तरुण गंभीर जखमी
कोल्हापूर : टकमधील टेपचा आवाज कमी करण्यास सांगितल्याच्या रागातून ट्रक चालकाने तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये समर्थ चंद्रकांत ट्रकमधील आवाज कमी करण्यास सांगितल्याने ट्रक चालकाकडून कृत्यपारगांवर (वय २५ रा. शाहूनगर, राजारामपुरी) हा गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास राजारामपुरी पोलीस स्टेशनच्या पिछाडीस ही घटना घडली.
याप्रकरणी संदीप विठ्ठलराव देशमुख (वय ४४ रा. कृष्णानगर, उंब्रज, कराड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री समर्थ पारगांवकर हा पोलीस स्टेशनच्या आवारात फिरत होता. यावेळी राजारामपुरी पोलीस स्टेशनच्या पिछाडीस एक ट्रक थांबला होता. या ट्रकमध्ये मोठ्याने गाणी लावण्यात आली होती.
समर्थन ट्रकचालक संदीप देशमुख यास गाण्यांचा आवाज कमी करण्यास सांगितले. या कारणातून या दोघांमध्ये वाद झाला. या वादातून चिडून ट्रक चालक देशमुख याने ट्रकमधील धारदार शस्त्राने संदीपवर वार केला. हा वार चुकविण्यासाठी संदीपने दोनही हात पुढे केले. यामध्ये त्याच्या दोोही हातांना गंभीर दुखापत झाली. त्याने तत्काळ या घटनेची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली. या घटनेची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली.








