हिरेबागेवाडी पोलिसांची कारवाई
बेळगाव : हिरेबागेवाडी (ता. बेळगाव) येथील इलेक्ट्रीक दुकानातील चोरी प्रकरणी शिवाजीनगर येथील तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळून 3 लाख 80 हजार किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. मलिक खलील हुबळ्ळी (वय 28) रा. शिवाजीनगर असे त्याचे नाव आहे. बेळगाव ग्रामीणचे एसीपी बी. एम. गंगाधर यांच्या मार्गदर्शनाखाली हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक एस. के. होळण्णवर, उपनिरीक्षक बी. के. मिटगार, एम. आय. तुरमुरी, प्रभाकर भुशी, वाय. एम. मुन्नवळळ, प्रीतम कोचेरी, आर. एस. केळगीनमणी, तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, महादेव काशिद आदींनी ही कारवाई केली आहे. हिरेबागेवाडी येथे संशयास्पदरित्या फिरताना मलिकला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने दोन ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली. मलिक हा व्यवसायाने रिक्षाचालक आहे. 90 बंडल वायर, एक ऑटोरिक्षा, कात्री असे एकूण 3 लाख 80 हजार किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.









