कोल्हापूर :
शहरातील राजारापुरी परिसरात गांजाची विक्री करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. सनत प्रताप देशपांडे (वय 34, रा. गुणगौरव अपार्टमेंट, राजारामपुरी, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 78 हजार 250 रुपये किंमतीचा 3 किलो गांजा आणि 10 हजार रुपयांचा मोबाईल असा 88 हजार 250 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मंगळवारी रात्री उशिरा ही कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती अशी, संशयित सनत देशपांडे हा 31 डिसेंबरच्या रात्री राजारामपुरीतील 11 व्या गल्लीत काही तऊणांना अवैधपणे गांजाची विक्री करत होता. याची माहिती राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार संदीप सावंत यांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्यावऊन पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजणे आदींच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी संशयित सनत देशपांडे गांजाची विक्री करताना मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 78 हजार 250 ऊपये किंमतीचा 3 किलो गांजा आणि मोबाईल असा 88 हजार 250 ऊपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.








