कोल्हापूर :
शहरातील ताराबाई पार्क मधील एका लॉजीस्टीक्स कंपनीची 7 लाख 24 हजार 456 ऊपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहुपूरी पोलिसांनी कंपनीच्या डिलेव्हरी बॉयला अटक केली. यासिन कलंदर नदाफ (वय 24, रा. शाहुनगर, हनुमान मंदिरामागे, जयसिंगपूर, ता. शिरोळ) याला अटक केली. या फसवणूकीबाबत कंपनीचे मॅनेजर कपिल अशोक रोटे (रा. बाहुबली, ता. हातकणंगले) यांनी फिर्याद दिली आहे.
ताराबाई पार्कात इन्स्टाकार्ट सर्विसेस प्रा. लि. कंपनी आहे. ही कंपनी प्लीपकार्ट कंपनीची सबसिडी कंपनी आहे. या कंपनीचे मॅनेजर म्हणून कपिल रोटे काम पाहत आहेत. तर संशयीत आरोपी यासिन नदाफ हा तऊण डिलेव्हरी बॉय म्हणून नोकरी करतो आहे. त्याने दिवाळी सणाच्या कालावधीत कंपनीतील सर्व कर्मचारी वाढलेल्या ऑर्डर्सच्या कामात व्यस्त होते. याचा फायदा घेवून त्याने कंपनीतील इन स्कॅन झालेला माल डिलेव्हरी करताना तो आऊट स्कॅन कऊन, तो माल डिलेव्हरी करीत, त्याचे पैसे कंपनीमध्ये जमा न करता, 452 वस्तुचे 7 लाख 24 हजार 456 ऊपयाची कंपनीची आर्थिक फसवणूक केली. याबाबत कंपनीचे मॅनेजर रोटे यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात संशयीत यासिन नदाफ (रा. शाहुनगर, हनुमान मंदिरामागे, जयसिंगपूर, ता. शिरोळ) आणि त्याचा साथिदार विशाल संजय लोहार (रा. मालती अपार्टमेंट समोर, जागृतीनगर, राजारामपूरी, कोल्हापूर) या दोघाविरोधी फिर्याद दाखल केली. या पोलिसांनी गुन्हा दाखल कऊन, संशयीत यासिन नदाफला अटक केली.








