तालिबानात सामील होण्याची होती इच्छा
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर येथे 31 डिसेंबरच्या रात्री पोलीस अधिकाऱयांवर चाकूने हल्ला करणाऱया आरोपीबद्दल अधिक माहिती समोर आली आहे. ट्रेवर बिकफोर्ड या युवकाला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. चाकूने हल्ला करताना या युवकाची एक डायरी रस्त्यावर पडली होती. ही डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे. आपण तालिबानमध्ये सामील होऊ इच्छितो असे या युवकाने या डायरीत लिहिले होते. तसेच स्वतःचा भाऊ अमेरिकेच्या सैन्यात सामील झाल्याप्रककरणी त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. 31 डिसेंबर रोजी सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी तैनात अनेक पोलीस अधिकाऱयांवर ट्रेवरने चाकूने वार केले होते. ब्रिकफोर्ड हा अमेरिकेतील तपास यंत्रणा एफबीआयच्या रडारवर होता. डिसेंबर महिन्यातच एफबीआयने त्याची चौकशी केली होती. विदेशात जाऊन मुस्लिमांची मदत करण्याची आणि धर्मासाठी स्वतःचा जीव देण्याची इच्छा त्याने व्यक्त केली होती.









