वृत्तसंस्था/ हरिद्वार (उत्तराखंड)
2025 सालातील पहिली युवा ऑल स्टार्स कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धा 6 मार्चपासून हरिद्वारमध्ये खेळवली जाणार आहे. सदर स्पर्धा येथील वंदना कटारिया इनडोअर स्टेडियममध्ये होणार आहे.
या स्पर्धेच्या प्रत्येक दिवशी 4 सामने खेळविले जातील. सदर स्पर्धा 4 एप्रिलला संपणार आहे. या स्पर्धेमध्ये देशातील युवा कब•ाrपटूंना अधिक संधी देण्यात आली आहे. सदर स्पर्धेमध्ये 12 संघांचा समावेश राहिल. हे संघ 2 गटांमध्ये विभागण्यात आले आहेत.









