गडहिंग्लज,वार्ताहर
Gadhinglaj Accident News : बेरडवाडीकडून गडहिंग्लजच्या दिशेने येत असताना चोथेवाडी परिसरात सौरभ शामराव घेज्जी (वय २५) या युवकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री ७ च्या सुमारास घडली असून, याची नोंद रात्री उशिरापर्यंत गडहिंग्लज पोलीस ठाण्यात करण्यात आली नव्हती.
सौरभ हा काम आटपून आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना मार्गावरील चोथेवाडी परिसरात आल्यानंतर समोरून येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्याला जोराची धडक दिली. या धडकेत सौरभच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला तातडीने गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले पण, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मयत सौरभच्या मागे आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत गडहिंग्लज पोलीसात करण्यात येत होती.
Previous Articleस्वच्छतागृह उभारणीकरिता सकारात्मक चर्चा
Next Article दहावी-बारावी परीक्षेतील गैरप्रकारात घट









