भाग – 1
अलीकडेच वर्षा सहलीच्या निमित्ताने एका ठिकाणी गेलो होतो. तिथेच तरुणाईचा एक गट भटकंती करायला आला होता. त्या स्पॉटच्या जवळच एक हॉटेल आणि एक सुरेख टुमदार बंगला होता. बंगल्याच्या नजीकच आमची कार पार्क केली होती. त्या बंगल्याबाहेर एक मध्यमवयीन स्त्री त्या गटाकडे एकटक पहात होती. मलाही कुतूहल वाटत होते की ती एवढं काय पाहते आहे? मी कारजवळ उभी होते. तेवढ्यात ‘..अगं ए शरे…इकडे काय करतेस? कुणाकडे पाहतेस इतका वेळ?’ असं म्हणत एक गृहस्थ बाहेर आले. पांढरं शुभ्र धोतर, अंगात सदरा, उंच आणि तशी धिप्पाड शरीरयष्टी, सतेज कांती..
‘अण्णा, तुम्ही कशाला बाहेर आलात? सध्या मी आहे ना? आतूनच हाक मारायची.’ ‘शरे, एरवी मी एकटाच असतो. चार दिवसात ऐषआरामाची सवय व्हायची…असो, मला सांग तू काय पाहतेस नेमकं?’
‘अण्णा ती मुलं पाहिलीत का? मस्त धम्माल करतायत.. मुलं मुली अगदी मनमोकळेपणानं….’
‘हं..ते काही नवीन आहे का? आमचा धबधबा फेमस झालाय. पण तू काय पाहतेस एवढं?’
‘मला आमचे तरुणाईचे दिवस आठवले… तीस पस्तीस वर्षांपूर्वी इतकी मोकळीक होती का हो? असा बिनधास्तपणा, मनमोकळं खळखळून हसणं, बोलणं..मला हेवा वाटतो या पोरांचा..’
‘शरे, त्यावेळचा काळ वेगळा होता. अगं खेडेगावात असूनही तुला कॉलेजला तरी घातली. सगळीच वानवा त्यावेळी.. पण आमच्या पिढीपेक्षा तुमचा काळ बरा. तुम्ही निदान पुस्तकं वह्या देणं-घेणं, कधी स्पर्धा, सहली या निमित्तानं बोलायचात तरी. आमच्यावेळी सारंच वेगळं होतं. कुणाला काही विचारावं, कुणाचा निरोप द्यावा वाटला तरी मनातच रहायचा. शाळेत मुली अत्यल्प पण तरीही संवाद नाहीच. अगं या मोकळेपणाच्या वा शिक्षणाच्या बाबतीतच नव्हे तर सारंच बदललंय आता. पहा बरं..आमच्यावेळी लग्न करताना इतर चर्चा दूरच…त्या मुलीला आपला नवरा पहायला मिळायचा अंतरपाट दूर झाल्यावरच. कोण सुचवेल त्यावर भरवसा ठेवायचा नी पुढे चालायचे! पण तुला सासरी पाठवताना स्थळाची तरी नीट चौकशी केली आम्ही आणि आताच्या मुलांना तर काय संसार मांडताना फ्रिज, टीव्ही, कार, बंगला याशिवाय संसार अशक्य वाटू लागला आहे. ‘नवं नवं नवं’चा ध्यास आणि हप्त्यांची वाढती संख्या. नवनवीन पॅशन, स्मार्ट फोन, जीवनाच्या बदलत्या संकल्पना पूर्ण करण्यासाठी आणि वाढत्या महागाईसोबत जुळवून घेण्यासाठी गल्लेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्यांचे शोध, यामधे ‘समाधान’ मात्र हरवत चाललंय पोरी.’
‘हो अण्णा, हे म्हणणं पटतंय मला. पण आमच्यावेळी इतकी मोकळीक नव्हती हो कॉलेजात गेलो तरी’
‘ही मुलं मुली पहा ना कशी बिनधास्त एकमेकांच्या खांद्यावर हात टाकत सेल्फी काढतायत.’
‘dरपोरी तेच तर सांगतोय. सारं वातावरणच बदललंय आता. मजेच्या संकल्पना बदलल्या, मूल्ये बदलली. या धबधब्याकडे कुणी पहायचं का? आपल्या गावात हॉटेलं होतील, कारच्या रांगा लागतील असं स्वप्नात तरी वाटलं होतं का?’
‘कर्म !! जंगल सगळं. तेव्हा कोण येतंय धडपडत इथे असं वाटायचं…आता विश्वास बसणार नाही असे बदल झालेत हे मात्र खरं!’
‘हां..मग या जशा सुधारणा झाल्या तसे जीवनातही बदल झाले. लग्न संस्थेचाच प्रवास कुठे चाललाय पहा की आता. तसंच या सहलींचं झालंय. लोक बदल म्हणून तुमचं काय ते आउटींग बिउटींगला येतात. आता बदललंय सारं..वातावरण, आहार, विचार करायची पद्धत, पोषाख, कुटुंबपद्धती सारंच बदललंय.’
अनय-‘ए आई, अगं काय करताय? माझी निघायची वेळ झाली. नंतर म्हणशील न सांगता निघून गेला म्हणून’
अण्णा-(हसत) ‘अरे अनय, तुझी आई त्या धबधब्यावर आलेल्या मुलामुलींचा मोकळेपणा, बिनधास्तपणा पाहून मला फैलावर घेतेय.’
‘अण्णा……….तुम्ही पण ना….’ अनय, डबा, पाणी घेतलंस का?
अनय-आई लहान आहे का मी आता? कारने जातोय. नाहीच घेतलं तर मिळतं सारं वाटेत गं. तू कुल रहा.’
अण्णा-(हसत)…पहा असा फरक आहे पोरी.
शरयू-‘मी कुलच असते रे बाबा हल्ली.. बाहेर आले आणि गोंगाट कानावर आला. सहज डोकावले, पाहिलं तर ही पोरं धम्माल करतायत. आमच्या कॉलेजचा काळ आठवला. तेव्हाचं वातावरण, बंधनं आठवली.’
अनय- हं..ठीक आहे. पण मनातल्या भावना त्याच आणि तितक्मयाच सारख्या. फक्त व्यक्त करण्यात मोकळेपणा आहे, हा फरक..चल…’ असं म्हणत अनय निघून गेला.
अण्णा-‘बघ शरे, किती सोप्या भाषेत एका झटक्मयात गुंता सोडवला पोरानं…ही पिढीच वेगळी.’
शरयू-‘हो…नातू आहे म्हणून कौतुकं सारी.’
अण्णा-(हसत) ‘काळ बदलला पोरी. बदल होणं हा प्रत्येक गोष्टीचा स्थायीभाव आहे. कधी लक्षात येणार नाही अशा धीम्या गतीने तो होतो तर कधी इतक्मया झपाट्यानं की, आपण गांगरून जातो. पण बदल स्वीकारायला हवेत आणि करायलाही.’ असे म्हणत बापलेक घरात गेले..पिढ्या पिढ्यातील बदलत्या तरुणाईच्या वाटचालीवर पुरेसा प्रकाश टाकणारा हा संवाद होता.
प्रत्येक पिढीला एक सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती मिळत असते, ज्यामुळे त्या त्या पिढीची मानसिक जडण घडण होत जाते. तऊणाईचा अभ्यास करत असताना ही गोष्ट प्रकर्षाने पुढे येते. तऊणाईचं समोर येणारं चित्र हे त्या त्या वेळच्या सभोवतालच्या परिस्थितीनुसार आकाराला येताना दिसतं. पहा, स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या पिढीला त्या तरुणाईला त्यावेळी स्वातंत्र्याची जी देणगी मिळाली ती अनेक नेत्यांच्या असामान्य कर्तृत्वाची, त्यागाची, बलिदानाची परिणती होती. त्या तरुण पिढीनं तशा खूप हालअपेष्टा सोसल्या होत्या. परंतु देशाच्या स्वातंत्र्यासोबतच काही आकांक्षा, स्वप्नंही मिळाली होती. अफाट कष्ट, जिद्द याच्या बळावर तऊणाई काही करायचा प्रयत्न करत होती. विशेष सोई सुविधा नसताना किंबहुना त्या सर्वांचीच वानवा असतानाही येईल त्या परिस्थितीतून मार्ग काढायचा हे त्या पिढीचं जणू ब्रीदच होतं. कुटुंब ही ताकद होती. पैसा हे ‘साधन’ होतं ‘साध्य’ नव्हतं. स्त्रियांना त्यावेळी शिक्षण असेल वा व्यक्त होणं असेल तसं स्वातंत्र्य नव्हतंच. साधारणत: सत्तरच्या दशकामधील तऊणाईमधे हळूहळू वेगळ्या रीतीने शिक्षणाचं महत्त्व ऊजू लागलं परंतु खेडोपाडी स्थिती तशी अवघडच होती. बहुसंख्य ठिकाणी अफाट परिश्र्रम घेतल्याखेरीज शिक्षण सहजरीत्या होत नसे. आर्थिक सुबत्ता नव्हती. शिक्षणाची आस असलेल्या तऊणाईने शहरात जावून, जशी वेळ येईल तसं जुळवून घेत शिक्षण घेणं पसंत केलं. तरुणीही शिक्षणाच्या दिशेने वळू लागल्या होत्या. परंतु आर्थिक स्वातंत्र्य फार क्वचितच वाट्याला यायचं. त्यावेळच्या तऊणाईच्या नात्यातही तसा मोकळेपणा नव्हता. जेंडर रोलचा जबरदस्त पगडा होताच. साधारणत: नव्वदच्या दशकातली तऊणाई झपाट्याने बदलू लागली. शिक्षण, अन्य कला कौशल्ये यांचं महत्त्व मूळ धरू लागलं. शिक्षण, त्या अनुषंगाने आवश्यक सर्व गोष्टी याकडे तरुण वर्ग नीट लक्ष देऊ लागला. पालकही हळूहळू जागऊकतने तरुणाईला पाठिंबा देऊ लागले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे जवळपास खेडोपाडी पोहचू लागलं. शेती श्रेष्ठ, मध्यम व्यापार आणि नोकरी कनिष्ठ हे समीकरणच बदललं..दळणवळणाची वाढलेली साधनं, विचारांचं आदान-प्रदान यामुळे मुलं मुली तशी समानतेने शिक्षणप्रवाहात येऊ लागली. जगण्याचे संदर्भ हळूहळू बदलू लागले. तरुणाईची मुशाफिरी सर्व क्षेत्रात दिसू लागली. याविषयी जाणून घेऊया पुढच्या लेखात…
-अॅड. सुमेधा संजीव देसाई








