कोल्हापूर :
महापालिकेतर्फे रंकाळा तलावाची स्वच्छता केली जाते. तरीही याठिकाणी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी कचरा इतरत्र न टाकता कचरा पुंडीतच टाकावा. कोल्हापुरचे वैभव असणारा आपल्या सर्वांचा रंकाळा नेहमी स्वच्छच राहीला पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
महापलिकेच्यावतीने आयोजित स्वच्छता मोहिमेअंतर्गत गुरूवारी रंकाळा तलाव परिसरातील उद्यानांची स्वच्छता करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. रंकाळा परिसराची स्वच्छता मोहिम दर पंधरा दिवसातून घेऊया. मोहिमेला नागरीकांनी चांगला प्रतिसाद मिळत असुन रंकाळा परिसरामध्ये लागणाऱ्या सेवा–सुविधा, कचरा ड्रम, गटाराचे सांडपाणी, ड्रेनेजचे काम, तुटलेली लोखंडी ग्रीलची कामे करून घेवू, असे आश्वासन त्यांनी दिले.
येडगे म्हणाले, ऐतिहासिक वास्तुची नासधुस होणार नाही याची सर्वांनी दक्षता घेण गरजेचे आहे. सर्वांनी नियमांचे पालन करून रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. रंकाळा हा नेहमी स्वच्छ राहीला पाहिजे, हि माझी, तुचमी व सर्व कोल्हापूर वासियांची जबाबदारी असल्याचे सांगितले

महापालिकेच्यावतीने संपुर्ण रंकाळा उद्यान व परिसरातील मुख्य रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत हि स्वच्छता मोहिम सुरु होती. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेचा प्रारंभ रंकाळा टॉवर जाऊळाचा गणपती येथील चौकातून करण्यात आला. रंकाळा टॉवर येथून डी मार्ट उद्यान, शालिनी पॅलेस उद्यान, पदपथ उद्यान या परिसराची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी फिरती करुन स्वच्छता करत करत पाहणी केली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त साधना पाटील, पंडीत पाटील, सहा.आयुक्त नेहा आकोडे, संजय सरनाईक, स्वाती दुधाणे, उज्वला शिंदे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव सुनील बिद्रे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, एन एस पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, आर के पाटील, रमेश कांबळे, सुरेश पाटील, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील आदी उपस्थित होते.








