मुंबई : गांधी जयंतीनिमित्त कॉंग्रसने (Congress) आज मुंबईत भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) आयोजित केली. या एकदिवसीय ‘भारत जोडो यात्रे’मध्ये काँग्रेससह शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सामील झाले. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विरोधात संयुक्त आघाडी उभारत शिवसेना आणि इतर बिगर भाजप पक्षांनी एकदिवसीय ‘भारत जोडो यात्रे’मध्ये काँग्रेसमध्ये सहभाग घेतला.
महाराष्ट्र विकास आघाडील (MVA) प्रमुख पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना (Shivsena) त्याचबरोबर भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) आणि 21 सामाजिक संघटनांनी देखील यामध्ये सहभाग दर्शविला. महात्मा गांधींनी १९४२ मध्ये सुरू केलेल्या भारत छोडो आंदोलन ज्या गोवालिया टँकपासून सुरू केले होते तिथून ती मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी भाजप आणि एआयएमआयएम देशात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करून लोकशाही संपविण्याचा कट रचत आहेत असा आरोप केला. तसेच “ज्या शक्तींना देश एकसंध ठेवायचा आहे, त्या शक्ती एकत्र आल्या आहेत,” असे सांगून त्यांनी शिवसेनेच्या सहभागाबद्दल आभार मानले.
दक्षिण मुंबई शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) आणि पक्षाच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे, शिवसेना आमदार पांडुरंग सपकाळ, स्थानिक विभाग प्रमुख आणि माजी आमदार रवींद्र मिर्लेकर या नेत्यांनी शिवसेनेकडून सहभाग दर्शविला. सावंत यांनी भाजप द्वेष पसरवत असल्याचा आरोप स्वतःला हिंदुत्वाचा वारसदार म्हणून चुकीच्या पद्धतीने मांडणी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. भाजप देशात विभाजनाची बीजे पेरण्याचा प्रयत्न करत आहेत, असाही आरोप त्यांनी केला. मुंबई आणि महाराष्ट्राचे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू आझमी, सीपीआय नेते प्रकाश रेड्डी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या राखी जाधव आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) हे पक्ष देखील मोर्चात सामील झाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








