भूक मिटविण्यासाठी करते हे काम
मॅसाच्युसेट्समधील 24 वर्षीय युवती कॅरोलिनने सप्टेंबर 2017 मध्ये पहिल्यांदा आईस्क्रीम खाल्ल्यावर एलाफिलेक्टिक शॉकचा अनुभव घेतला होता. यानंतर तिला ब्रेड आणि पिझ्झा खाल्यावरही अशाचप्रकारी रिअॅक्शन्स झाल्या. मग तिला भात आणि बीन्स खाल्ल्यावरही गंभीर रिअॅक्शनमुळे 12 दिवसांपर्यंत आयसीयूत रहावे लागले होते.
मी प्रत्येक गोष्टीपासून अॅलर्जिक आहे अणि केवळ दोन प्रकारच्या खाद्यपदार्थांवर निर्भर आहे, यातील एक ओट्स किंवा त्यापासून तयार खाद्यपदार्थ आणि दुसरे हाइपोअॅलर्जिक इन्फंट फूड, हे लहान मुलांसाठी एक प्रकारचे फूड सप्लिमेंट आहे. स्वत:च्या मर्यादित डायटनंतरही प्रत्येक क्षणाला, प्रत्येक सणाला आणि आनंदाच्या संधींना एन्जॉय करत असल्याचे कॅरोलिनने सांगितले आहे.
ही अॅलर्जी काही महिन्यांमध्ये बरी होईल अशी आशा डॉक्टरांना होती. 2017 मध्ये जेव्हा मला पहिल्यांदा वारंवार काही खाल्ल्याने शॉक येत होते, तेव्हा माझे अॅलर्जिस्ट आणि ईआर डॉक्टर या माझ्या प्रतिक्रिया केवळ काही महिन्यांपुरती राहतील असे मानत होते. डॉक्टरांनी मला एंटीहिस्टामाइन औषधे दिली आणि एका तज्ञाकडे पाठविले होते असे कॅरोलिनने सांगितले.
युवतीनुसार या रिअॅक्शन्स थांबल्याच नाहीत, दरदिनी मला रुग्णालयात दाखल व्हावे लागेल असे वाटायचे. माझ्या गळ्यात त्रास होऊ लागला, मग खाज अन् श्वसनात त्रास जाणवू लागला. सुमारे एक वर्षाच्या तपासणीनंतर मे 2018 मध्ये मास्ट सेल अॅक्टिव्हेशन सिंड्रोम (एमसीएएस) नावाच्या दुर्लभ आजाराने पीडित असल्याचे निदान झाले. हा आजार वारंवार गंभीर अॅलर्जी प्रतिक्रियांच्या लक्षणांचे कारण ठरतो असे कॅरोलिनचे सांगणे आहे.
अत्यंत अवघड होता उपचार
या आजारावर उपचार होता, परंतु भावनात्मक स्वरुपात हे अवघड होते. कारण मला माझ्या खाण्यापिण्याच्या सवयींना नियंत्रित करायचे हेते. मी अत्यंत स्पष्ट आणि साधी युवती आहे. हा आजार आणि याच्या उपचारासंबंधी कळल्यावर मी आणि माझी आई दोघीही रडत होतो. हा एक जुना आजार असून आम्हाला त्यानुसार उपचार करण्याची गरज होती. उपचारानंतरही मला केवळ दोनच गोष्टी खाता येणार होत्या, असे कॅरोलिनने सांगितले.
ओट्स, स्पेशल फूड सप्लिमेंटचा पर्याय
आता माझी डायट केवळ ईलकेकर आणि ओटमील आहे. एका विशिष्ट ब्रँडच्या हायपोअॅलर्जिक इन्फंट फॉर्म्युलाचा उल्लेख करत तिने मी दिवसात तीनवेळा हेच खात असल्याचे सांगितले आहे. याचबरोबर ती अनेक औषधे घेते, ज्यात दैनिक, साप्ताहिक आणि अर्धमासिक औषधे सामील आहेत. यानंतरही ती स्वत:च्या खाद्य मर्यादा आणि मर्यादित डायटसोबत सामान्य स्वरुपात जगण्याचा प्रयत्न करते.
पार्टीमध्ये घेऊन जाते स्वत:चे अन्न
मी रात्री स्वत:च्या परिवारासोबत डिनरमध्ये सामील होते. मी भोजनासाठी बाहेर जाते, परंतु स्वत:सोबत अन्न घेऊन जाते. उपचार सुरू झाल्यापासून मी कुणासमोर काहीच खाऊ शकत नव्हते. हे निश्चितपणे अवघड आहे, कारण विशेष भोजन हे सणासुदीच्या काळातील मुख्य आकर्षण असते, तरीही मी स्वत:च्या स्पेशल डायटसोबत आनंदाने नाताळ पार्टी साजरी करते असे तिचे सांगणे आहे.
थेरपिस्टचा सल्ला
सद्यकाळात मी एमसीएएस थेरपिस्टसोबत मिळून विविध खाद्यपदार्थांना आजमावत आहे. तरीही काहीच उपयोगी पडलेले नाही. यातून मला कुठल्या गोष्टीची रिअॅक्शन्स होते हे कळणार असल्याचे तिचे सांगणे आहे.









