कुरळप :
वाळवा तालुक्यातील एका २१ वर्षीय मुलीचे लग्रासाठी अपहरण करण्यात आले. मुलीच्या गावातूनच मुलीला चित्रपट स्टाईल प्रमाणे चारचाकी गाडीतून बळजबरीने बसवून पळवून नेण्यात आले. या अपहरण प्रकरणात तिघांचा सहभाग होता. तरुणीला पळून नेऊन वाळवा येथील नातेवाईकांच्या घरी संबंधित तरुणीला ठेवण्यात आले होते.
या अपहरण प्रकरणाची फिर्याद संबंधित मुलीच्या कुटुंबीयांकडून कुरळप पोलिस ठाणे येथे दाखल करण्यात आली आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, कुरळप पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील एका गावातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या २१ वर्षीय तरुणीचे बावची येथील तरुणाने लग्र करण्यासाठी अपहरण केल्याची घटना घडली आहे. अपहरण करून तरुणीला वाळवा येथील नातेवाईकांच्या घरी डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत सुरज विष्णु जाधव व त्यांचे दोन साथीदार अक्षय भानुदास अनुसे, सागर पंडित पाटील यांना कुरळप पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले आहे. संबंधितांना न्यायालया समोर उभे केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुरज विष्णु जाधव यांचे सोबत लग्र करण्यासाठी संबंधित तरुणीचे अपहरण करण्यात आले होते. सुरज जाधव व त्याचे मित्र अक्षय व सागर यांनी तरुणीला गुरुवार दि. २८ मे रोजी सकाळी आठ वाजता तीच्या गावातून चारचाकी वाहनातून घेऊन गेले. जबरदस्तीने तरुणीला चारचाकी वाहनात बसविण्यात आले.
वाळवा येथील नातेवाईकांच्या घरी सायंकाळी सात वाजेपर्यंत डांबून ठेवण्यात आले होते. दुसऱ्या कोणाशी कसे लग्र करतेस बघतोच असे म्हणून तरुणीचा मोबाईल सुध्दा काढून घेतला होता.
या अपहरण प्रकरणी तरुणीला संबंधित तरुणांच्या कडून दमदाटी केल्याचेही फिर्यादीत म्हंटले आहे. सुरज विष्णू जाधव, विष्णू जाधव, कमल विष्णू जाधव, अक्षय भानुदास अनुसे, सागर पंडित पाटील (सर्व रा. बावची, ता. वाळवा) यांचे विरुद्ध तरुणीने कुरळप पोलिसात फिर्याद दिली आहे.
तरुणीच्या या फिर्यादीवरून शुक्रवारी संशयित सुरज विष्णू जाधव, अक्षय भानुदास अनुसे, सागर पंडित पाटील यांना ताब्यात घेऊन इस्लामपूर न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाकडून संबंधित तरुणांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील माने करत आहेत.








