Kolhapur News : कोल्हापुरात भर चौकात एक तरूण हुक्का मारत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. धैर्यप्रसाद चौकात ही घटना घडली आहे. केवळ एकाच दिवशी हा प्रकार घडला नसून भर चौकात प्रत्येक 15 दिवसाला असाच प्रकार घडत असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वात प्रथम तरूण भारतने या वृत्ताची माहिती समोर आणली आहे.असे प्रकार घडत असताना गांधीनगर आणि कोल्हापूर पोलीस काय करत आहेत,असा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे.
एवढेच नाही तर भर रस्त्यात तावडे हॉटेल परिसरात युवकांनी कारवर आतषबाजी केल्याचा व्हिडिओ देखील तरूण भारत प्रतिनिधाच्या हाती लागला आहे. भर चौकात दम मारो दम करणारा युवक हा बेटिंग आणि हुक्का व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर काही चौकात मध्यरात्री आतषबाजी करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे पोलीसांनी तातडीने या प्रकारात लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









