राजापूर :
तालुक्यातील पेंडखळे – भू रस्त्यावरून दुचाकीने प्रवास करत असताना अचानक बिबट्याने उडी टाकल्याने दुचाकीचा अपघात होवून अनिल चिपटे हे जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. यामध्ये अनिल यांना गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले.
पेंडखळे चिपटेवाडीतील सुनील राजाराम माळी आणि संकेत जुवळे हे दोघे स्टॉपपासून भू गावच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना अचानक रस्त्यात बिबट्याची पिल्ले आली, पण ती पिल्लेही दोघांना भाट वाघाची आहेत, असे वाटली. पण ती पिल्ले बाजूच्या झाडीत लगेच निघूनही गेली, परंतु हे तऊण गाडी न थांबवता पुढे गेले. मात्र त्यांना लगेच मागून बिबट्यांच्या डरकाळीचा आवाज आला आणि त्यांनी गाडीचा थोडा वेग वाढवला आणि गाडी पळवली. पुढे पेंडखळे शाळा क्रमांक 1 जवळ गतिरोधक आहे, तिथे गाडीचा वेग थोडा कमी केला आणि मागे पाहिले असता बिबट्यांनी मागून डरकाळी फोडत 200-300 मीटर चिपटेवाडी फाटा (चव्हाण यांचे घर) इथपर्यंत दुचाकीचा पाठलाग केला.
सुनील माळी व सहकाऱ्याने आपला जीव वाचवत पुढे सुतार माळावरील गुरव यांचे दुकान गाठले आणि कोणी दुचाकीवरून चिपटेवाडी किंवा जुवळेवाडीत जात असेल तर त्यांना थांबवत पुढे बिबटे आणि पिल्लं आहेत, असे सांगितले. तसा मेसेजही त्यांनी पेंडखळे गावातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवला. परंतु थोड्या वेळाने अनिल चिपटे हा त्या रस्त्याने चिपटेवाडी ते चिपटेवाडी फाटा (चव्हाण घर) या दिशेने कामानिमित्त निघाला असताना अचानक चिपटे यांच्या दुचाकीवर 3 बिबट्यांनी उडी मारली आणि चिपटे गाडीवरून खाली पडले आणि यामध्ये त्यांना दुखापत झाली. या हल्ल्यात त्यांच्या कमरेपासून ते पायापर्यंत दुखापत झाली. याचदरम्यान अन्य काही तरुणांनाही येथे बिबट्याची पिल्ले व तीन बिबटे दिसल्याचे बोलले जात आहे.
जखमी चिपटेंना तातडीने राजापूर ग्रामीण ऊग्णालयात दाखल करण्यात आले. दुखापत गंभीर स्वऊपाची असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय ऊग्णालयात दाखल करण्यात आले. बिबट्यांकडून दुचाकी वाहने तसेच ग्रामस्थांवर सातत्याने हल्ल्याच्या घटना घडत आहेत. वनविभागाने या घटनेची त्वरित दखल घेऊन या बिबट्यांचा बंदोबस्त करावा व जखमी अनिल चिपटे यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
- बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी उपाययोजना हाती घेणार
या घटनेची तत्काळ दखल घेत वनविभागाने पेंडखळे गावात प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. तर जखमी अनिल चिपटे यांची विचारपूस करत त्यांना सहकार्याची ग्वाही दिली. बिबट्यांनी पाठलाग केल्याने घाबरलेले अनिल चिपटे हे पडून जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती राजापूर वनपाल जयराम बावदाणे यांनी दिली. तर तातडीने ग्रामस्थांशी चर्चा करून जनजागृती हाती घेण्यात आली असून बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.








