रत्नागिरी, प्रतिनिधी
Ratnagiri Crime News : रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे सांडमवाडी येथे मस्करीतून मित्रावर धारदार चाकूने सपासप वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवारी दुपारी २.३०. च्या सुमारास घडली.या घटनेत गंभीर जखमी झालेल्या प्रथमेश मंदार तिवरेकर ( 23. राहणार गावडे आंबेरे सांडमवाडी ) याला उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अक्षय अशोक हळदणकर (वय- 25, राहणार गावडे आंबेरे सांडवाडी ) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्यावर पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमेश तिवरेकर ,अक्षय हळदणकर,राज तिवरेकर,ओंकार तीवरेकर हे नातेवाईकाला पाहण्यासाठी रत्नागिरीतील एका खाजगी रुग्णालयात आले होते. त्यानंतर त्यांनी कोकण नगर येथे एकत्र चायनीज खाल्ले त्यानंतर ते सर्व गावडे आंबेरे येथील घरी जाण्यासाठी निघाले रात्री २ वाजण्याच्या सुमारास गावडे अंबरे येथे आले असता ओंकार तीवरेकर व अक्षय हळदणकर यांच्यात मस्करी वरून वाद निर्माण झाला.दोघांमध्ये झालेला वाद प्रथमेश व राज तिवरेकर यांनी मध्यस्थी करून सोडवला.
दरम्यान, प्रथमेश आपल्या घरी गेल्यानंतर रात्री २ च्या सुमारास अक्षय हळदणकर याचा चुलत भाऊ शुभम हळदणकर हा प्रथमेश याच्या घरी आला.यावेळी त्याने अक्षयला कोणी मारहाण केली तुमच्यात काय झाले अशी विचारणा केली.याचवेळी शुभम याच्या मागून आलेल्या अक्षय याने आपल्याकडे लपवून ठेवलेला चाकू अचानक बाहेर काढला या चाकूने त्याने प्रथमेशाच्या हातावर पाठीवर सपासप वार केले.यावेळी झालेल्या गोंधळा मुळे गावकरी जमा झाले.गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या प्रथमेशाला ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेत भरून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.घडल्या प्रकाराबाबत प्रथम याने पूर्णगड पोलिसात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी अक्षय हळदणकर याच्याविरोधात भादवी कलम 326 नुसार गुन्हा दाखल करण्यात आहे.









