खेड :
कोकण रेल्वे मार्गावरील शेरी भोईवाडा रेल्वे रुळानजीक रेल्वेची धडक बसून दीपेश गणपत मोरे (38, रा. आयनी–बौद्धवाडी नं. 1) याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 13 मार्च रोजी रात्री 9 वाजण्याच्या पूर्वी घडल्याचे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
कोकण मार्गावरून धावणाऱ्या एका रेल्वेची धडक बसल्याने त्याच्या डोक्यासह पायाला गंभीर दुखापती हेऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे कर्मचारी गस्त घालत असताना रेल्वे रुळानजीक मृतदेह आढळून आला. त्यानुसार पोलीस ठाण्यात कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.








