वारणानगर / प्रतिनिधी
आनंदनगर,कोडोली ता.पन्हाळा येथील सचिन संजय दरबारे वय ३५ या तरूणाने राहत्या घरातील बडोद्यास ओढणीने गळफास लावून आज मंगळवार दि. १३ रोजी दुपारी १ वा. च्या सुमारास आत्महत्या केली.
सचिन हा पेंटीगची कामे करीत होता पत्नी बरोबर वाद झाल्याने तो नाराज होता अशा नाराजीतूनच त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. सचिनचा भाऊ अक्षय याने कोडोली पोलीसात वर्दी दिली आहे. सचिनला जवळच असलेल्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यानी सांगीतले. अधिक तपास कोडोली पोलीस करीत आहेत.









