पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचे प्रतिपादन : तरुण भारत’च्या आरती संग्रहाचे प्रकाशन
पणजी / प्रतिनिधी
तरुण भारत एक कुटुंबाप्रमाणे असून कुटुंबाप्रमाणेच कार्य करते. तरुण भारतमधून प्रसिद्ध होत असलेल्या राजरंगमधून राजकारणीची भूमिका कशी असावी , कुठे कमी पडतो , काय करणे आवश्यक आहे याबद्दल कळते. आता आरती संग्रह प्रकाशित करून तरूण भारतने पुढचे पाउल टाकले असल्याचे प्रतिपादन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी तरुण भारत कार्यालयात आयोजित केलेल्या आरती संग्रह प्रकाशन सोहळय़ाप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना केले.
यावेळी तरुण भारत गोवाच्या संचालिका सई ठाकूर, संपादक सागर जावडेकर, सागर अग्नी, जाहिरात विभागाचे व्यवस्थापक रवी पाटील, वितरण विभागाचे प्रमुख शंकर जाधव, उपसंपादक राजू नाईक, राजेश परब, जाहिरात विभागाचे प्रशांत बेळगावकर, पत्रकार जय नाईक, विजय मळीक, शैलेश तिवरेकर, प्रज्ञा मणेरीकर, सोशल मीडीयाचे दत्तराज नाईक, रितेश देसाई , जनसंपर्क अधिकारी व व्यवस्थापक मंगेश काळे उपस्थित होते.
मंत्री रोहन खंवटे यांच्याहस्ते आरती संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सई ठाकूर यांनी मंत्री खंवटे यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.संपादक सागर जावडेकर यांनी रोहन खंवटे हे धडाडीचे मंत्री असून पर्यटन खाते त्यांच्याकडे येण्यापूर्वी अनेक पर्यटनातील बेकायदेशीर कृत्य उघडकीस आणली आहेत. आता त्यांच्याकडे पर्यटन खाते आले असल्याने त्यातील व्यवहार सुरळीत चालतील असे मत व्यक्त केले.यावेळी सई ठाकूर यांनी मंत्री खंवटे यांचे पुष्गुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रकटन मंगेश काळे यांनी केले.









