पडीक शेतीला पुर्नर्जीवित करण्यासाठी शेतकरी उत्सूक : सरकारने ट्रॅक्टर व इतर सुविधा पुरवाव्यात
वार्ताहर /माशेल
तिवरे येथे शेतकरी आपली पारंपारिक शेती पुर्नजिवीत करण्यासाठी सद्या धडपडत आहे. येथील युवा शेतकऱ्यांनीही याकामी कंबर कसली असून पार्टटाईम नोकरी करीत आपली पारंपारिक भातशेतीसाठी ते उत्सुक आहेत. त्याना हवी असलेली सरकारच्या शेतकी खात्याची व कृषीमंत्र्याची वेळोवेळी मदत मिळत नसल्याने शेतकरी नाराजीचा सुर आळवत आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना येथी शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडली. शेखर नाईक गावकर सांगितले की तिवरे येथे श्रीराम फार्मस क्लबने एकूण 400 शेतकरी आपला पारंपारिक शेती व्यवसाय करण्यास उत्सूक आहेत. या शेतकऱ्यांना कामगार घेऊन शेती करणे अशक्य आहे कारण कामगारांना दिवसाकाठी रूपये 700-800 मोजावे लागत असून ते सामान्य शेतकऱ्यांना परवडत नसल्याची माहिती दिली. पुर्वी घरातील सर्व मंडळी शेतीकामे करायची त्यामुळे ते शक्य होती. सद्या युवकांना आपली पारंपारिक शेती टिकवून ठेवण्यासाठी पार्टटाईम शेती व फुलटाईम नोकरी अशी कसरत करावी लागत आहे. सरकारने अत्याधुनिक अवजारांसह मदत पुरविण्याचे आवाहन त्dयांनी केले.
वायंगण शेतीच्या कामाल आता प्रारंभ होतोय
तिवरे येथे वायंगण शेतीला प्रारंभ झाला आहे. ही शेतीची मशागत करायला ट्रक्टर पाहिजे. परंतू शेतकरी खात्यात कार्यालयात गेल्यावर कुठलेच सहकार्य मिळत नाही, टॅक्टर का देत नाही अशा प्रश्न विचारल्यास ते सांगतात टॅक्टर शेतात रूतून राहतो, त्यामुळे मातीची मशागती करायला ट्रक्टर देणे शक्य नाही. गेल्यावर्षीपासून शेतकी खात्याला कार्यालयात खेपा मारून सुद्धा संबंधित अधिकारी आमच्या समस्येवर काणाडोळा करतात. जास्त पैसे देऊन खासगी भाड्याचा ट्रॅक्टर आणणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही.
शेतकऱ्याची शेती करण्याची तळमळ
शेतकी खात्याकडून मशिनरी मिळत नसल्याने सद्या शेतकऱ्यांनी इक्सीकेव्हेटर आणून शेतजमिन मशागत करण्यात सुरूवात केली आहे. या खार्चिक होत चालेल्या समस्येमुळे 200 शेतकऱ्यांनी भातशेती लागवड करणे सोडून दिले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याच्या शेतीत झाडेझुडपे वाढून जमीन पडीक होत आहे. सद्या दोनश शेतकरी पैशाची जमवाजमव करून इक्सकाव्हेटरने शेतजमीन सपाट करण्याचे काम सुरू आहे. काही शेतकऱ्यांना हे परवडत नसले तरी बलराम फार्मस क्लब यात पुर्ण लक्ष घालीत असल्यामुळे शक्य होत आहे.
जमीन सुपीक सर्वत्र झऱ्याचे पाणी
देवाचे वरदान लाभल्यासारखे निरंतर पाण्याचा स्रोत आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतात पाण्याची कमतरता नाही. सर्व शेतकऱ्यांना शेती लागवडीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत असते. पाण्याची टंचाई कधीच भासत नसल्याचे येथील शेतकरी मंगेश गावकर यांनी सांगितले. सद्या पारंपारिक आमच्या वडीलोपार्जित शेती व्यवसाय आम्ही नोकरी धंदा साभाळून पुढे नेत आहे. बहुतेक शेतकरी या शेतीच्या पिकावर आपले जीवन जगत आहे. पारंपारिक शेती टिकावयची असल्यास शतकी खात्याने या पारंपारिक शेतकऱ्यांना शेती व्यवसाय टिकून ठेवण्यास मदत पुरवावी. शेतकी मंत्री रवी नाईक यांनी फोंडा परिसरातील शेतकऱ्याच्या समस्याची माहिती आहे. शेतकऱ्यासाठी ते सातत्याने काम करीत आहे. त्यामुळे तिवरे येथील शतकऱ्याच्या समस्यांनी जाणून घेऊन शेतकी खात्याकडे चौकशी करावी व तिवरेच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा असे सुशांत गावकर यांनी सांगितले. स्थनिक आमदार गोविंद गावडे यांनी आम्हाला यापुर्वी शेतीलागवडीसाठी सहकार्य केले होते. यंदाही त्यानी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. यावेळी पत्रकारांशी समस्या मांडताना शेखर गावकर, सुशांत गावकर, रत्नाकर गावकर, लक्ष्मीकांत गावकर, मुरली नाईक, अंनत नाईक, प्रदीप गावडे, दिलीप गावडे, मदन गावकर, भानुदास गावडे, विशांत गावडे उपस्थित होते.









