गेविंददेव गिरीजी महाराज : विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
बेळगाव : भगवंताने प्रत्येकाला इच्छाशक्ती दिली आहे. ती व्यर्थ न घालविता इच्छाशक्तीचा वेळोवेळी उपयोग केला पाहिजे. कोणतेही कार्य करताना त्यावर निष्ठा असायला हवी. एकाग्रतेने काम करण्यास शिकले पाहिजे, असा उपदेश गेविंददेव गिरीजी महाराज (मथुरा) यांनी विद्यार्थ्यांना केला.अॅकडमी ऑफ कम्पॅरिटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलिजनच्या (एसीपीआर) हिंदवाडीतील गुऊदेव रानडे मंदिरात शुक्रवारी गेविंददेव गिरिजी महाराज यांचे विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यान झाले. शिवाजी महाराजांनी लहान वयात सैन्यदल उभे केले होते. शिवरायांमध्ये प्रचंड इच्छाशक्तीबरोबर कार्य करण्याची शक्ती, ज्ञानशक्तीही तितकीच होती. मोठे उद्दिष्ट गाठण्यासाठी काहीवेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात. मी, माझा परिवार, माझा देश, माझी संस्कृती याची जाण प्रत्येक विद्यार्थ्यांत असली पाहिजे. सुख हवे तर विद्या नाही अन् विद्या हवी असल्यास सुखाच्या मागे लागू नये. माझे कार्य केवळ माझ्यापुरते मर्यादित न राहता देशाला उपयोगी झाले पाहिजे, असा विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे, असेही महाराज म्हणाले. व्याख्यानाला विविध महाविद्यालयांतून सुमारे 300 विद्यार्थी व एसीपीआरचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी, उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रमुख पाहुणे विनायक लोकूर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी टेक्नॉलॉजीचा सदुपयोग केला पाहिजे. विद्यार्थी कऊणा कल्लोळकर व चैतन्य एकबोटे यांनी सूत्रसंचालन केले.









