जळगाव / प्रतिनिधी :
तुम्ही आरोप करा, आम्ही कामाने उत्तर देऊ. आपल्या सरकारचे लोक ज्या-ज्या ठिकाणी जातात, त्या-त्या ठिकाणी त्यांना लोकांचे प्रेम मिळते. ही आपल्या कामाची पावती आहे. या सरकारने प्रत्येक कॅबिनेट मिटींगमध्ये सामान्य जनतेच्या हिताचेच निर्णय घेतले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
जळगाव जिल्हयातील 270 कोटी रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन, उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. शिंदे म्हणाले, राज्याचा विकास सामान्यांचा विकास हे उद्दिष्ट समोर ठेवून सरकारचे काम सुरू आहे. सामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी हे सरकार आहे. म्हणूनच थांबवलेल्या 22 जलप्रकल्पांना आम्ही मान्यता दिली. 5 लाख हेक्टरपर्यंत जमीन सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शेतकऱयांसाठी जे-जे करता येईल ते-ते करू, असे सांगत शेतकरी वाचला पाहिजे. त्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे काम सरकार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिक वाचा : चिंचवडमध्ये ‘मविआ’ची डोकेदुखी वाढली; ‘वंचित’चा कलाटेंना पाठिंबा
तीन तालुक्यांना जोडणाऱ्या तापी नदीवरी पुलाच्या भूमिपूजनानंतर बोलताना ते म्हणाले, या पुलामुळे तालुक्यांचा 70 किमी. चा फेरा वाचणार आहे. अमळनेर तालुक्यातील रखडलेल्या निम्न तापी प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल. धरणगाव, अमळनेर पाचोरा चोपडासह पाच तालुक्यात एमआयडीसी स्थापन करण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.








