पंजाबला सांघिक विजेतेपद तर महाराष्ट्राला उपविजेतेपद

बेळगाव : उत्तराखंड येथील हलदवानी येथे इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशन व मिनिस्टर ऑफ युथ अॅफियर्स व स्पोर्ट्स गर्व्हमेंट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 12 व्या फेडरेशन चषक राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत महिला शरीरसौष्ठव स्पर्धेत सरितादेवी (मणिपूर), महिला मॉडल फिजिक्समध्ये योगीता सिंगार (उत्तरप्रदेश), मेन्स फिजिक्समध्ये विकास खाजुरिया (जम्मू काश्मिर) तर हिमांशू (उत्तराखंड) यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकाविले. तर सांघिक विजेतेपद पंजाबने तर उपविजेतेपद महाराष्ट्र संघाने पटकाविले.
पुरुष स्पोर्ट्स फिजिक्स दिव्यांग 165 पर्यंत गटात – 1) हिमांशू (उत्तराखंड) 2) सागर मौर्य (उत्तराखंड) 3) मोहितकुमार (उत्तराखंड) 4) अर्जून चौहान (दिल्ली). फिजिक्स दिव्यांग 165 वरील गटात – 1) विकास खाजुरिया (जम्मू काश्मिर) 2) अनिकेत रविंद्र सावंत (महाराष्ट्र) 3) नटराजन (तामिळनाडू) 4) प्रतापसिंग अधिकारी (उत्तराखंड) 5) मितेश ठक्कर (महाराष्ट्र). महिला गट – 1) एल. सरितादेवी (मणिपूर) 2) इंगुडम कविता चानू (मणिपूर) 3) सुशिला साहो (झारखंड). महिला स्पोर्ट्स फिजिक्स मॉडल – 1) योगीता सिंगार (उत्तरप्रदेश) 2) रितादेवी (चंदीगड) 3) सोनिया मित्रा (प. बंगाल) 4) खुशबू यादव (उत्तरप्रदेश) 5) रितू पात्रा (प. बंगाल) यांनी विजेतेपद पटकावले. विजेत्या स्पर्धकांना आयबीबीएफचे अध्यक्ष प्रेमचंद डिग्रा, सचिव सेरल शेठ, एशियन संघटनेचे सचिव चेतन पठारे, अजित सिद्धन्नावर आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना चषक, पदके, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.









