बेळगाव : मकर संक्रांतीचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज रविवारी सकाळी हलगा येथील सुवर्ण विधानसौध परिसरात योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉक्टर नितेश पाटील, यांच्यासह पोलिस आयुक्त बोरलिंगया तसेच अन्य खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील योगप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. मकर संक्रांतीच्या दिवशी सुवर्णसौध परिसरात आज पार पडलेला योगाभ्यासाचा कार्यक्रम विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.










