अग्निशामक दल आणि आपत्कालीन सेवा संचालनालयात योगदिन साजरा
पणजी : योग हा शांततेचे प्रतिक आहे. योगामुळे जगात सहिष्णुता, स्वीकृती आणि शांतता वाढीस लागली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस हा आंतरिक आणि बाह्य शांतता आणेल आमि समाजाला सहिष्णुतेकडे नेईल, असा मला विश्वास आहे. त्यामुळे योगाला नियमिततेची जोड द्यावी, असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हींगच्या वरिष्ठ प्रशिक्षक श्रद्धा परब यांनी केले. अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाच्या मुख्यात आंतरराष्ट्रीय योगदिन कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर श्रद्धा परब मार्गदर्शन करीत होत्या.
यावेळी योग आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रशिक्षक अथर्व परब, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक नितीन रायकर, इतर अधिकारी व जवान उपस्थित होते. अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाने आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक गुऊदेव श्री श्री श्री रविशंकर, गोवा चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने 21 रोजी सकाळी 7 वाजता अग्निशमन दलाच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. दलाच्या अधिकाऱ्यांना व जवानांना योगाची प्रात्यक्षिके करून दाखवल्यानंतर त्यांना योगाचे प्रकार नियमित कशाप्रकारे करावेत तसेच त्या चे शरीराला व मनाला होणारे फायदे यासंबंधी योग प्रशिक्षक श्रद्धा परब व अथर्व परब यांनी मार्गदर्शन केले.









