
वार्ताहर /पालये
श्रीदत्त पद्मनाभ पीठ व प.पू सद्गुरु माऊलींच्या कृपाशीर्वादाने पेडणे तालुक्मयातील दत्त पद्मनाभ पिठ शिष्य परिवारातर्फे कोरगाव येथे आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात पेडणे तालुक्मयातील विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती होती. यावेळी खास आमंत्रित पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, नगराध्यक्ष माधव शेणवी देसाई, उपनगराध्याक्ष तृप्ती सावळ देसाई, नगरसेवक सिद्धेश पेडणेकर, कमळेश्वर कोरगाव हायर सेकंडरीच्या प्राचार्य जुही जयेश थळी, पेडणे औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य दत्तप्रसाद पाळणी आदींसह सरपंच व पंच देखील उपस्थित होते.
दरम्यान, स.7 वा. सद्गुरुंच्या नामस्मरणाने व अतिथिंच्या हस्ते दीप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मांदे संत समाजाचे अध्यक्ष महेश गोडकर यांनी मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रास्ताविक दत पद्मनाभ पीठाचे संचालक आदरणीय संजय कळंगुटकर यांनी केले. नियमित योगासन केल्याने शारिरीक व मानसिक ऊर्जेच्या विकासासोबत तणाव आणि नैराश्य कमी कमी होते. याद्वारे शरीर निरोगी आणि मन शांत ठेवण्यासाठी योगा एक वरदान आहे, असे प्रतिपादन श्रीराज शेलार यांनी केले.
विद्यार्थ्यांनी या तीन सूत्रांचा अवलंब करून स्वतःला तंदुरुस्त बनवावे, असे दत्तप्रसाद पाळणी म्हणाले. पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी आरोग्यासाठी योग महत्त्वाचा आहे, सर्वांनी तो करावा, असा सल्ला दिला.
पेडणे तालुक्मयातील दहावी शालांत परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्तम यश प्राप्त करून दिल्याबद्दल अकरा शाळांचे मान्यवरांतर्फे सन्मान करण्यात आला. श्रीराज शेलार यांनी योग साधना विषयी प्रात्यक्षिके करून दाखवली. डेमोस्ट्रेशन सुमेधा सावळ देसाई यांनी केले. शेलार त्यांनी आभार मानले. शेवटी कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम्ने झाली.









