प्रतिनिधी / बेळगाव
पतंजली योग समितीतर्फे दि. 16 रोजी सकाळी 9 ते 12 यावेळेत ईएसआय हॉस्पिटल, लव्ह डेल शाळा, बेम्को हैड्रोलिक्स, शांती फौंड्री, बी. के. कंग्राळी येथील शाळा येथे योगाभ्यास वर्ग घेण्यात आला.
ईएसआय हॉस्पिटलमध्ये निरीक्षक प्रकाश पुंडे आणि डॉक्टर तसेच नर्स उपस्थित होते. सर्व ठिकाणी किरण मन्नोळकर, पुरुषोत्तम पटेल, रमेश पाच्छापुरे, शंकर कुद्री, मगनभाई पटेल, संगीता कोणपुरे, ज्योतिबा भादवणकर, राचप्पा गेंजी या सर्वांनी योग प्रशिक्षण दिले.









