मुंबई
शेअरबाजारामध्ये येस बँकेचा समभाग गेल्या दोन दिवसांमध्ये 19 टक्के इतका वाढला असल्याचे दिसून आले आहे. कार्लाईल समूह व वेअरवेंटा होल्डींग्ज यांच्यामार्फत भांडवल उभारणीकरिता रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. या परवानगीमुळे येस बँकेचा समभाग सोमवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 7 टक्के वाढत 21 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या दोन दिवसांच्या सत्रामध्ये हा समभाग 17 टक्के इतका वाढीव राहिला आहे.









