तांत्रिक कारणामुळे निकाल पुढे ढकलला
बेळगाव :
महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक खटल्याचा शनिवार दि. 25 रोजी निकाल देण्यात येणार होता. मात्र काही तांत्रिक कारणामुळे हा निकाल पुढे ढकलण्यात आला असून 28 जानेवारी रोजी यावर सुनावणी होऊन निकाल देण्यात येणार आहे.
येळ्ळूर गावच्या वेशीतील महाराष्ट्र राज्य फलक हटविल्यानंतर गावात जनक्षोभ उसळला होता. याप्रकरणी पोलिसांनी विविध गुन्हे ग्रामस्थांवर दाखल केले होते. यापैकी गुन्हा क्र. 166 चा खटला द्वितीय जेएमएफसी न्यायालयात सुरू आहे. पोलिसांनी एकूण 30 जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी तिघांना यापूर्वीच खटल्यातून वगळण्यात आले आहे. तर एकट्याचा मृत्यू झाला आहे. या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून शनिवारी निकाल देण्यात येणार होता. मात्र या खटल्यातील मृत्यू झालेल्या एकट्याचा मरण दाखला पोलिसांनी न्यायालयात दाखल केला नाही. या तांत्रिक कारणामुळे शनिवारचा निकाल पुढे ढकलण्यात आला. सुनावणीला सर्व संशयित उपस्थित होते. मात्र आता 28 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होऊन त्याचदिवशी निकाल देण्यात येणार आहे. संशयितांतर्फे अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. शाम पाटील, अॅड. हेमराज बेंचण्णावर काम पहात आहेत.









