बेळगाव : साऊथ कोंकण एज्युकेशन सोसायटीच्या कर्मचारी वर्गाच्यावतीने आयोजित एसकेई क्रिकेट स्पर्धा 2025 वर्ष तिसरे या स्पर्धेचे उद्घाटन रविवारी सकाळी आरपीडी जीएसएस महाविद्यालयाच्या चिंतामणराव पटवर्धन मैदानावर झाले. यामध्ये अंतिम सामन्यात यलो वॉरियर्सने एसकेई चषकावर आपले नाव कोरताना रेड वॉरियर्सचा 18 धावांनी पराभव केला. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एसकेई सोसायटीचे सदस्य ज्ञानेश कलघटगी, एन. एन. भातकांडे, माजी प्राचार्य अरविंद हलगेकर, विवेक पाटील, रामकृष्ण, सविनय शिमनगौडर, नागेश हलगेकर उपस्थित होते. यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यष्टीपूजन व श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
साखळी सामन्यांच्या फेरीत पहिला सामना ऑरेंज वॉरियर्स विरूद्ध यलो वॉरियर्स यांच्यात झाला. ऑरेंज वॉरियर्सने 10 षटकात 5 गडी बाद 78 धावा केल्या तर यलो वॉरियर्सने 2 गडी बाद 79 काढून हा सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात सामनावीर संतोष बुवाने 37 काढून 1 गडी बाद केला. दुसऱ्या सामना रेड वॉरियर्स आणि ब्ल्यू वॉरियर्स यांच्यात झाला. ब्ल्यू वॉरीयर्सने 10 षटकात 5 गडी बाद 98 धावा केल्या. तर रेड वॉरियर्स संघाने 10 षटकात 99 धावा करून 6 गडी राखून विजय मिळविला. रेड वॉरियर्सच्या विनय नाईकने 30 धावा व 1 गडी बाद केल्याने त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.
तिसऱ्या सामना संघ यलो वॉरियर्स आणि ब्ल्यू वॉरीयर्स संघात झाला. यलो वॉरीयर्सने 10 षटकात 1 गडी बाद 186 धावाचा डोंगर उभा केला. प्रसाद नाकाडीने 122 धावा करून शतक झळकवले. ब्ल्यू वॉरियर्सने 10 षटकात 6 गडी बाद 58 धावा केल्या. यलो वॉरियर्स संघाने 128 धावांनी विजय मिळविला. प्रसाद नाकाडी यांना सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. बाद फेरीतील पहिल्या सामन्यात ऑरेंज वॉरियर्स संघाने 8 षटकात 4 गडी बाद 80 धावा केल्या. रामभाऊ हुद्दारने 52 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल ब्ल्यू वॉरियर्सने 8 षटकात 8 गडी बाद 46 धावा केल्या. ऑरेंज वॉरियर्सने हा सामना 34 धावांनी जिंकला. सामनावीर बसवराज गौंडाडकरने 17 धावात 4 गडी बाद केले.
दुसरा सामन्यात यलो वॉरियर्सने 8 षटकात 4 गडी बाद 53 धावा केल्या. रेड वॉरियर्सने 4 षटकात 2 गडी बाद 54 धावा केल्या. सामनावीर अमित कुऱ्याळकरने 42 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. अंतिम सामना रेड वॉरीयर्स विरूद्ध यलो वॉरियर्स यांच्या झाला. प्रथम फलंदाजी करताना यलो वॉरियर्सने 10 षटकात 5 गडी बाद 97 धावा केल्या. भूषण पाटील व प्रसाद नाकाडी यांनी प्रत्येकी 31 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना रेड वॉरियर्स संघाने 10 षटकात 8 गडी बाद 79 धावा केल्या. अमित कुऱ्याळकरने 24 धावा केल्या तर यलो वॉरियर्स संघाच्यावतीने भूषण पाटीलने 3 गडी बाद केले. भावेश बिर्जेने 2 गडी बाद केले. भूषण पाटीलला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून रमेश कुंभार व राजश्री कुंभार, बाजीराव शिंदे, विद्यालयातील शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.









