नैऋत्य मान्सूनने आज महाराष्ट्रात काही ठिकाणी आगमन केले आहे. दक्षिण कोकण द. मध्य महाराष्ट्रासह, संपूर्ण गोवा, कर्नाटक, तामिळनाडू व आंध्रप्रदेशचा काही भागात मान्सूनने एंट्री केली आहे. आयएमडी पुण्याचे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी राज्यात मान्सूनच्या आगमनाची वर्दी देत असतानाच भारतीय हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ दिला आहे.
महाराष्ट्रात पावसाच्या आगमनाबरोबर तो मुसळधार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ११ व १२ जूनला महाराष्ट्रातील काही भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
बिपरजॉय वादळाचा तडाखा 15 जून पर्यंत संपूर्ण गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छ या भागाला बसणार असून गोवा, महाराष्ट्रातील कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला 11जून आणि 12 जून हे दोन दिवस वादळी वाऱ्याचा तडाखा बसणार आहे. त्यामुळे हवामान खात्याने महाराष्ट्रात काही भागात यलो अलर्ट दिला आहे.