10 जणांनी उपस्थित राहण्याची गरज
प्रतिनिधी/ बेळगाव
येळ्ळूरच्या वेशीतील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हा फलक हटविल्यानंतर येळ्ळूरच्या जनतेला अमानुष मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर जनतेवरच खटले दाखल करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी येथील जेएनएफसी न्यायालयामध्ये सुरू आहे. सोमवारी खटला क्रमांक 794/15 च्या खटल्याची सुनावणी असून त्यामधील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वकिलांनी केले आहे.
या खटल्यामध्ये कुमार परशराम मासेकर, मनोज लक्ष्मण नायकोजी, केदारी राघोजी पाटील, नंदू गोपाळ कुगजी, राहुल अर्जुन अष्टेकर, नामदेव विठ्ठल कदम, राजू जोतिबा नायकोजी, सुधीर परशुराम धामणेकर, जयसिंग यल्लाप्पा अष्टेकर, परशराम नारायण कुगजी यांचा समावेश आहे. या सर्व कार्यकर्त्यांनी सोमवारी उपस्थित राहणे गरजेचे आहे. या खटल्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच निकाल लागणार आहे. या सर्वांच्यावतीने अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. शाम पाटील, अॅड. हेमराज बेंचण्णावर हे काम पाहात आहेत.









