येळ्ळूर: पाहुण्यांच्या हळदीला जात असताना ओव्हरटेक करणाऱ्या मोटारसायकलने धडक दिल्याने येळ्ळूरच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. सोमनाथ नागेंद्र उर्फ भोला पाखरे (वय 23, रा. रामदेव गल्ली, येळ्ळूर) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ हा बिल्डींग कंत्राटदार होता. सोमवारी रात्री आपल्या नातेवाईकांची हळद होती. त्यामुळे दुचाकीवरून रात्री 8.30 च्या सुमारास तो वडगावकडे जात होता. यावेळी सैनिक भवनच्या समोर गवत भरलेल्या ट्रॅक्टरला बेळगावकडून येणाऱ्या हिरोहोंडास्वाराने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी समोरून येत असलेल्या सोमनाथच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये सोमनाथ हा गंभीर जखमी झाला. य् ाा अपघातानंतर सोमनाथला तातडीने येळ्ळूर केएलईमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचाराचा उपयोग न झाल्याने त्याचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. या घटनेत हिरोहोंडास्वारही जखमी झाला असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सोमनाथच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, बहीण, आजी, काका असा परिवार आहे. सोमनाथ हा माजी ग्राम पंचायत अध्यक्ष भोला पाखरे यांचा चिरंजीव होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवारी सकाळी 8 वाजता रक्षाविसर्जन होणार आहे.
Previous Articleदक्षिण-उत्तर मतदारसंघांचे कामकाज मनपाच्या प्रशासकीय इमारतीत
Next Article आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









