तालुक्यातील पहिली ग्रा. पं. : विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन, लाभ घेण्याचे आवाहन
बेळगाव : ग्रामपंचायत कारभारामध्ये पारदर्शकता व सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने येळ्ळूर ग्राम पंचायतीने ई- बँकिंग सुविधा उपलब्ध केली आहे. ग्रा. पं. अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्याचे उद्घाटन करण्यात आले. य् ाा ग्राम पंचायतीने एक मोठे पाऊल पुढे टाकले असून तालुक्यामध्ये पहिलीच ई-बँकिंग सुविधा उपलब्ध करणारी ग्रामपंचायत ठरली आहे. या उद्घाटनासाठी तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी राजेश धनवाडकर, साहाय्यक निर्देशक राजेंद्र मोरबद, युनियन बँकेचे व्यवस्थापक कीर्तीराज कदम यांच्यासह ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते. तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी राजेश धनवाडकर म्हणाले, येळ्ळूर ग्रा. पं. ने नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. असे सांगत ग्रा. पं. चे विशेष कौतुक केले. युनियन बँक व्यवस्थापक कीर्तीराज कदम म्हणाले, ई-बँकिंग प्रणाली सुरू करणारी ही पहिली ग्राम पंचायत ठरली आहे. या ग्राम पंचायतला बँकेच्यावतीने जे काही सहकार्य करता येईल, ते आम्ही करू असे ठोस आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांनी ई-बँकिंग संदर्भातील माहिती सांगितली.
ग्रामस्थांना लाभ घेण्याचे आवाहन
सध्या डिजिटल आणि कॅशलेस प्रणाली सर्वत्र सुरू झाली आहे. त्यामुळे ई-बँकिंगचा उपक्रम राबवून सर्वांना सहकार्य करण्यासाठी आम्ही पाऊल उचलले आहे. या उपक्रमामुळे निश्चितच मोठा बदल घडणार आहे. तेव्हा याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रा. पं. अध्यक्ष सतिश पाटील यांनी केले आहे. नरेगा मजुरांचे वेतन, विविध योजनांचा निधी थेट आता संबंधितांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. त्यामुळे व्यवहारामध्ये पारदर्शकपणादेखील येणार आहे. तेव्हा कॅशलेस व्यवहाराला येळ्ळूर व अवचारहट्टी गावातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले. य् ाावेळी ग्रा. पं. उपाध्यक्ष लक्ष्मी मासेकर, ग्रा. पं. सदस्य शिवाजी नांदूरकर, प्रमोद पाटील, रमेश मेणसे, परशराम परीट, जोतिबा चौगुले, अरविंद पाटील, राकेश परीट, शशीकांत धुळजी, कल्लाप्पा मेलगे, राजू डोण्याणावर, प्रदीप सुतार, सुनील आरकळीकट्टी, मनीषा घाडी, रुपा पुण्यान्नावर, सुवर्णा बिजगकर, शांता काकतकर, वनिता परीट, रुक्मिणी नाईक, रेणुका मेलगे, लक्ष्मी कणबरकर, शांता मासेकर, राजकुवंर पावले, पीडीओ सदानंद मराठे व इतर कर्मचारी उपस्थित होते.









