रक्ताचा मासाचा चिखल झाला. बानू नेहमीपेक्षा लवकरच आज भाकरी भाजी घेऊन आली आणि समोर पाहते तो काय, बिचारी ते सगळे बघूनच तिथे मटकन खाली बसली. आणि एकदम मोठय़ा मोठय़ाने रडायला लागली. माझी मेंढर कुठे गेली, म्हणून सारखं विचारू लागली. माझी मेंढर भरून दे नाहीतर तुला पंचायतीच्या समोर उभा करते. आता सदाशिव गालातल्या गालात हसू लागला. बानूला म्हणाला मी तुझी मेंढर भरून देईल पण त्याच्या बदल्यात मला तू लग्नाला हो म्हण. बानुला ही मागणी विचित्रच वाटली. इतका म्हातारा माणूस एवढी मेंढर कुठून आणून देणार. म्हणून शेवटी ती म्हणाली, करते मी तुझ्याशी लग्न पण माझी मेंढर भरून दे आणि काय आश्चर्य एक एक मेंढरू जिवंत होऊन बानुच्या जवळ येऊन उभा राहिलं. त्या मेंढय़ांना बघून बानुला खूप आनंद झाला. ती प्रत्येक मेंढराला जवळ घ्यायची, मायेनं कुरवळायची, पण तिच्या लक्षात आलं तो सदाशिव मात्र गायब झालाय. ती नीट बघायला लागली तर तिला साक्षात समोर भगवान शंकर दिसले. तिला क्षणभर कळेच ना की हे खरं की स्वप्न. ती शंकरांना शरण गेली. आपल्या बोलण्याबद्दल तिने माफी मागितली पण आता तिला शंकरांशी लग्न करायला लागणार होतं. साऱया गावात आनंदाची बातमी पसरली. यथावकाश देवांच्या साक्षीने महादेवाने बानुचं लग्न झालं आणि आता महादेव धनगर वाडय़ात राहू लागले. तिथल्या शेतकऱयांना मदत करू लागले. धनगरांना मार्गदर्शन करू लागले. पण एवढय़ातच एक घटना घडली बऱयाच धनगरांच्या मेंढय़ा एकाएकी गायब होऊ लागल्या. गावाजवळ वाघाची पावलं दिसू लागली. आजामेळा नावाचा धनगर तर रडकुंडीला आला. तो येऊन देवाला म्हणू लागला, माझी मदत करा नाहीतर मला जगणं शक्मय नाही. माझी सगळीच मेंढरं संपायला आलीत. दुसऱया दिवशी देव स्वतः धनगराच्या वेशात निघाले. गावाबाहेरच्या जंगलात जिथे मेंढय़ा चरायला नेत होते तिथे जाऊन उभे राहिले. त्यांना जवळपासच्या झाडीत वाघ असल्याचा सुगावा लागला. वाघाने देवाकडे पाहिले आणि त्याला त्याचा मागचा जन्म आठवला. चंपू नगरीत राहणारा एक दुष्ट राजा, प्रजाजनांना छळणारा, त्याच्या कर्मामुळे या क्रूर वाघाच्या जन्माला तो आला होता. परंतु त्याचं पूर्व सुकृत चांगले असल्यामुळे त्याला महादेवांचे दर्शन झालं. महादेवांच्या हातून मृत्यू येणार यामुळे तो आनंदित झाला. देवांनी त्या वाघाच्या अंगावरती भंडारा उधळला आणि वाघाचा नायनाट करून त्याला मुक्ती दिली सगळीकडे आनंद झाला.
देव परत आले. आता बानुच्या इथले दिवस संपत आले होते. देवांनी बानूला घोडय़ावरती बसवलं आणि आता देव जेजुरीकडे निघाले.
क्रमशः








