Satara News : साताऱ्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या कास यवतेश्वर घाटामध्ये पुन्हा एकदा दरडी कोसळू लागल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास अचानकच यवतेश्वर घाटामध्ये मोठी दरड कोसळल्याने यवतेश्वर वरून कासकडे जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच यवतेश्वर घाटामध्ये दरडी कोसळत होत्या. त्यामुळे धोकादायक झालेल्या दरडीचे दगड सातारा बांधकाम विभागाच्या माध्यमातून काढण्यात आले होते. मात्र, पुन्हा एकदा धोकादायक दरडी आता निसटू लागल्याने यवतेश्वर घाटामध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्याचा धोका निर्माण झाला आहे. बांधकाम विभागाने पुन्हा एकदा घाटातील परिसराचा सर्वे करून धोकादायक असलेल्या दरडी हटवाव्यात अशी मागणी आता पर्यटकांकडून होऊ लागले आहे.